जनता विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय डांगसौंदाणे येथे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रम अंतर्गत दप्तर मुक्त शाळा अभियान राबविण्यात आले. त्यानुसार विद्यालयामध्ये वाचन महोत्सव साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी विविध कविता सुंदर चालीवर म्हणून दाखवल्या. काही विद्यार्थ्यांनी प्रकट वाचनातून बोधकथा, विविध विषयांवरील लेख
सादर केले. विद्यार्थ्यांना ग्रंथालयातील पुस्तकांचा परिचय होण्यासाठी तसेच वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी सामुदायिक वाचन केले. शिक्षकांनी वाचलेल्या पुस्तकांचा परिचय विद्यार्थ्यांना करून देण्यात आला. सदर उपक्रमास विद्यालयातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने व उत्साहाने प्रतिसाद दिला. विद्यालयाचे प्राचार्य सूर्यवंशी बी के सर यांच्या मार्गदर्शनातून सदर उपक्रम यशस्वीपणे राबवण्यात आला. उपशिक्षक सुनील मांडवडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व एका इंग्लिश पुस्तकाचा परिचय करून दिला. श्री सोनवणे व्ही डी सर यांनी एका मराठी पुस्तकाचा परिचय करून दिला. ज्येष्ठ शिक्षक कापडणीस एस वाय सर, पवार एस एन सर आदींसह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.