जनता विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय डांगसौंदाणे येथे राष्ट्रीय हरित सेनेच्या वतीने पर्यावरण पूरक मकर संक्रांति आनंदाच्या व उत्साहाच्या वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी इकोफ्रेंडली पर्यावरणासाठी इकोफ्रेंडली रांगोळी चे सुंदर दर्शन घडवले. विविध प्रकारच्या वनस्पतीच्या पाना-फुलांच्या रांगोळी मधून पर्यावरण वाचविण्याचे आवाहन विद्यार्थ्यांनी केले. नायलॉन युक्त मांजा असलेले पतंग,प्लास्टिकचा वापर करून बनविण्यात आलेले पतंग तसेच चिनी बनावटीचे पतंग न वापरण्याचा निर्धार केला. विविध प्रकारच्या बियांचे या वेळी वाटप करून आपल्यातील रुसवे फुगवे विसरून जाऊन मैत्रीचे प्रतीक म्हणून बीजारोपण करण्याचे आवाहन करण्यात आले.केंद्रप्रमुख बधान सर यांनी रांगोळी दालनाचे उद्घाटन केले. प्राचार्य पाटील सर,पर्यवेक्षक निकम सर व सर्व शिक्षक वृंद या सर्वांचे सहकार्य लाभले.